IPL मराठी माहिती

 



इंडियन प्रिमिअर लीग (आय.पी.एल) ही भारतातील ट्वेंटी-ट्वेंटी क्रिकेट विजेतेपदासाठीची साखळी स्पर्धा आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) तिचा प्रारंभ केला. तिचे मुख्यालय मुंबईत आहे. बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला हे या साखळी स्पर्धेचे चेअरमन आणि कमिशनर या नात्याने स्पर्धेचे पर्यवेक्षण करतात सन २००८ मध्ये पहिल्यांदा ही स्पर्धा घेण्यात आली. राजस्थान रॉयल्स या संघाने आय.पी.एल.चे पहिले विजेतेपद पटकावले. २०१२ मध्ये खेळवल्या गेलेल्या या स्पर्धेत नऊ संघांनी सहभाग घेतला. या संघांमध्ये जगभरातील खेळाडू सहभागी झाले.



Comments